लखनऊः समाजवादी पक्षाचे माजी वरिष्ठ नेते अमर सिंह यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची काही दिवसांपूर्वी माफी मागितली होती. त्यावेळी त्यांनी आपण सिंगापूरमध्ये मृत्यूशी झुंज देतोय, असं म्हटलं होतं. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ आलाय. काही जण माझ्या निधनाची बातमी पसरवत आहेत. ती पूर्णपणे खोटी आहे. ‘टायगर अभी जिंदा है’ असं त्यांनी म्हटलंय.
सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवलीय. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाहीए. माझ्यावर उपचार सुरू आहेत, असं अमर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलंय.
‘… तर दुप्पट ताकदीने परत येईन’
आई भगवतीची इच्छा असेल उपचारानंतर लगेचच दुप्पट ताकदीने परत येईन. तुमच्या होतो, तसाच पुढेही राहीन. परिचित शैल, प्रथा आणि परंपरानुसार जसं जगत आलोय तसाच पुढेही जगेन, असं अमर सिंह म्हणाले.
‘मृत्यू माझे द्वार ठोठावत आलीय’
जे माझ्या मृत्यूची वाट पाहता आहेत त्यांनी उगाच प्रयत्न करू नये. मृत्यूने माझे द्वार आधीही ठोठावलेय. विमानातून पडलो तरीही वाचलो. दहा वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झाले होते. तेंव्हाही मृत्यूवर मात करून परतलो. आखाती देशात १२-१३ दिवस व्हेंटिलेटवर राहून मृत्युशी लढलो आणि परतलो. त्या तुलनेत आता फारसा आरोग्याचा त्रास नाहीए. सर्व चेतना जागृत आहेत. १० वर्षांच्या मुलांप्रमाणे बुद्धी तेज आहे. तरीही जे निधनाच्या अफवा पसरवत आहेत त्यांचे कोटी-कोटी आभार, असं अमर सिंहांनी व्हिडिओत म्हटलं.

अधिक वाचा  ठाकरेंच्या लोकसभेच्या 18 जागा जवळपास निश्चित, समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर