कोची (केरळ): चीन आणि जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेतलेल्या करोनाने भारतातही शिरकाव केला आहे. एका ३६ वर्षीय तरुणाला एर्नाकुलमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणामध्ये कोविड-१९ सारखी लक्षणे आढळली होती. शुक्रवारी रात्री या तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नक्की करोना व्हायरसमुळे झाला आहे का, याचा तपास आता डॉक्टर्स करत आहेत. मृत पावलेला हा तरुण मलेशियावरून परतला होता. त्याची पहिली रक्त चाचणी केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले होते.
पहिली चाचणी निगेटीव्ह
अलापुझाच्या न‌ॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (NIV)पहिल्या अहवालानुसार, या तरुणाला कोविड-१९ ची लागण झाली होती. तथापि, या तरुणाचा मृतदेह सध्या अलिप्त ठेवण्यात आला आहे. या तरुणाचा शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमाराला मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिष्टाचारानुसार, यावर कोणताही निर्णय दुसऱ्या सॅम्पल टेस्टनंतरच घेतला जाऊ शकतो. या संदर्भात शनिवारी आरोग्य अधिकाऱ्यांनी एक बैठकही बोलावली. या बैठकीत नमुना तपासणीसाठी सॅम्पल पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मलेशियाहून आला होता तरुण
हा तरुण गेल्या अडीच वर्षांपासून एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. हा तरुण केरळमधील पेन्नूर येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्रीच हा तरुण कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. गुरुवारी रात्रीच त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
तीव्र न्यूमोनिया आहे मृत्यूचे कारण
या तरुणाच्या मृत्युबाबत केलेल्या तपासणीत त्याला तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया झाला होता असे स्पष्ट झाले आहे. तो डायबिटीक कीटोएसिडोसिसने देखील पीडित होता. हा आजार मधुमेहाच्या रुग्णांना होण्याचा संभव असतो आणि तो जीवघेणाही असतो. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया आणि श्वास यंत्रणा बंद पडल्याने झाला.

अधिक वाचा  भाजप माजी मंत्री बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, तात्काळ लीलावतीत केले दाखल