दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात मागच्या दोन महिन्यांपासून नागरीक सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाला बसले आहेत. रविवारी या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. इथे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
रविवारी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात येईल असे हिंदू सेनेने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर इथे मोठया प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्था राखण्याचा आमचा उद्देश असून, खबरदारी म्हणून मोठया प्रमाणावर आम्ही पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे असे दिल्लीचे सह पोलीस आयुक्त डी.सी.श्रीवास्त यांनी सांगितले. मागच्या आठवडयात दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. यामध्ये उत्तर पूर्व दिल्लीत ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक जखमी झाले. कोटयावधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिंदे ओबीसी मुद्द्यावरून खिंडीत? एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यानीही आक्रमक