महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टीकणार नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिलं. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी भाजपावर निशाणा तर साधलाच शिवाय त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार किती काळ टिकेल, याचंही उत्तर दिलं. दिल्ली हिंसाचारावरून शरद पवारांचा मोदींवर निशाणा
आपण गेले काही दिवस बघत आहोत, देशाच्या राजधानीला आग लागली आहे. दिल्ली शहर हे अनेक भाषिकांचं, धर्मीयांचं, विविध राज्यांमधुन आलेल्या नागरिकांचं असं एक महत्वाचं शहर आहे. विधानसभेची निवडणूक झाली, खरं म्हटलं तर त्या निवडणुकीपासूनच आज सत्ताधारीपक्ष जो देशात आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. ज्यावेळी सत्ता आणि लोकांचा पाठिंबा मिळत नाही त्यावेळी सांप्रदायिक विचारांचा आधार घ्यायचा, समाजात फूट पाडायची आणि जातीय व धार्मिक वातावरण तयार करून त्याचा लाभ घ्यायाचा यासंबंधीचे प्रयत्न सुरू झालेले होते.