मुंबई : 1989 मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री भाग्यश्री मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमामुळे भाग्यश्री रातोरात स्टार झाली होती. अभिनेत्री शक्यतो त्यांच्या करिअरच्या उभारत्या काळात लग्न करण्याचं टाळतात. मात्र भागश्री याला अपवाद ठरली. तिनं या सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या वर्षभरातच प्रोड्युसर हिमालय दासानी यांच्याशी लग्न केलं. या सिनेमाच्या रिलीज नंतर अनेक वर्षांना या सिनेमाचं शूट सुरू होतं त्यावेळी सलमान खान माझ्याशी फ्लर्ट करत असे असा धक्कादायक खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भाग्यश्रीनं तिच्या वैवाहिक आयुष्यातील बॅडपॅच बद्दल धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर आता एका मुलाखतीत तिनं सलमान खान बद्दलही नवा खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘मैंने प्यार किया’चं शूटिंग सुरू होतं त्यावेळी मी हिमालय दसानीशी रिलेशनशिपमध्ये होते. पण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमानला हे समजलं. त्यानंतर तो नेहमी माझ्या जवळ यायचा आणि माझ्या कानात गाणं गुणगुणायचा. मी त्याला नेहमीच तंबी देत असे की लोक आपल्याबाबत बोलायला सुरुवात करतील त्यावर त्यानं मला उत्तर दिलं, मी हिमालयला ओळखतो. सलमान सिनेमाच्या शूटिंगच्या अगोदर हिमालयला एकदा भेटला होता.
काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भागश्री म्हणाली, ‘अशी एक वेळ होती जेव्हा दीड वर्षासाठी मी आणि हिमालय एकमेकांपासून वेगळे झालो होतो. त्यावेळी माझ्या मनात असा विचारही आला की, जर ते मला भेटलेच नसते आणि मी त्यांच्याशी लग्न केलं नसतं तर. मला आजही आठवतं. हे सर्व जेव्हा मला आठवतं तेव्हा आजही मला खूप भीती वाटते.’ भाग्यश्रीच्या या खुलाशानं सर्वांना धक्का बसला होता. लग्नाच्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाग्यश्री तिच्या लग्नाविषयी मोकळेपणानं बोलली.
भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलायचं तर हे दोघं शाळेत असतानापासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र असं म्हटलं जातं की भाग्यश्रीचे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या विरोधात होते. पण मग सूरज बडजात्या, सलमान खान आणि काही जवळच्या मित्रमंडळींनी त्यांचं लग्न लावून दिलं मात्र याचा भाग्यश्रीच्या करिअरवर परिणाम झाला. ‘मैंने प्यार किया’नंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवता आलं नाही.

अधिक वाचा  ‘प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्या फक्त…’, शिवसेना शिंदे गटाचा प्रणिती शिंदेवर आरोप?