वेब क्वीन अशी ओळख झालेली अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या बोल्ड फोटोमुळे मराठमोळी मिथिला चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळतो.
मिथिला जे काही घालते ते अगदी स्टाईलने आणि ग्रेसफुली ती ते कॅरीही करते. तिचे कपडे किंवा मेकअप कधीच लाऊड नसतो. हलके-फुलके कपडे आणि न्यूड मेकअपमध्ये तिचं सौंदर्य घायाळ करणारं असतं. स्टायलिश किंवा आकर्षक दिसण्यासाठी नेहमी ब्रॉंडेड किंवा डिझाईनर कपडे घालणे गरजेचे नाही. तर तुमचे मोहक हास्यही तुमचे सौंदर्य खुलवते. हे मिथिलाचे फोटो पाहिल्यावर जाणवतं.

अधिक वाचा  ‘वंचित’ची भूमिका काय? महाविकास आघाडीची साथ, स्वतंत्र लढणार की तिसऱ्या आघाडीची स्थापना