ख्राइस्टचर्च : जागतिक ख्यातीचा फलंदाज विराट कोहलीवर दडपण टाकले तर त्यालाही चुका करण्यास भाग पाडता येते, ही समाधानाची बाब आहे, अशा शब्दांत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने भावना व्यक्त केली आहे.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने ३ विकेट्स घेत भारताला ६ बाद ९० अशा बिकट परिस्थितीत आणले. यजमान न्यूझीलंडने या संपूर्ण मालिकेत विराटला लक्ष्य केले आहे. चार डावात मिळून त्याला केवळ २० धावाच करता आल्या आहेत. त्याबद्दल बोल्ट म्हणतो की, विराट हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याबद्दल शंका नाही. त्यामुळे त्याच्यावर दडपण ठेवणे हे आमचे उद्दीष्ट होते. त्याला चौकार मारू द्यायचे नाहीत हे ठरविले. त्यामुळे त्याने चुका केल्या.

अधिक वाचा  मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठक; मविआचा मात्र बहिष्कार ओबीसी नेत्यांची ही मोठी मागणी, मुख्यमंत्री काय निर्णय?