पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पञकार संघ हा प्रभावी पञकार संघ म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो.ही संघटना महाराष्ट्र , कर्णाटक,गोवा तसेच दिल्ली याठीकाणी कार्यरत असुन तब्बल आठ हजारांपेक्षा ही जास्त पञकार सभासद असलेली राज्यातील एकमेव संघटना आहे.या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील वार्ताहर,पञकार व संपादक यांना पञकारांच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे.

प्रत्येक तालुका ,जिल्हा सह राज्यस्तरावर महाराष्ट्र पञकार संघाची कार्यकारिणी उत्तम प्रकारे कार्य करत आहे.त्यात पञकारांना हल्ल्या पासुन बचाव संरक्षणासाठी पञकार हल्ला विरोधी कमिटी स्वतंत्र काम करते ,पञकारांना पेन्शन मिळावी यासाठी शासनदरबारी प्रयत्न तसेच आरोग्य विम्याची जबाबदारी ,समाजउपयोगी जनतेच्या हीताचे उपक्रम राबवणे, समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ती ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ,शासकीय ,राजकीय ,सामाजिक ,क्रीडा,अर्थ विषयक घडामोडीवर लक्ष ठेवून जिल्हाशासन ,राज्यशासनाच्या निदर्शनास आणून देणे. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध पुरस्कार दिले जातात त्यात एखाद्या विषयात जीवनभर कौतुकास्पद कामगिरी केली असेल तर जीवनगौरव तसेच क्रीडा विषयक, पञकारिता सामाजिक ,उद्योजकीय,साहीत्य ,शैक्षणिक ,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कारासह यथोचित सन्मान केला जातो.प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे अधिवेशन घेतले जाते त्यास राज्य भरातील पदाधिकार्यासह सर्व पञकार सभासद उपस्थित असतात.त्यातच पञकाराविषयीचे तसेच समाजहिताचे प्रस्ताव मंजुर केले जातात व शासन दरबारी प्रस्ताव मांडले जातात .

अधिक वाचा  नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का?; काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

संघटनेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधानासह ,मुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती लाभलेली आहे.अनेक टिव्ही चॕनेल चे संपादक ,आघाडीच्या वृत्तपञाचे संपादक ,प्रतिनिधी या संघात पदाधिकारी म्हणून कार्य करत असल्यामुळे या संघटनेचे विशेष असे महत्त्व आहे.

आज पुणे येथिल पञकार संघाच्या पदाधिकार्यांच्या बैठीकत अनेक विषयावर चर्चा झाली तसेच काही नविन निवडी जाहीर करण्यात आल्या .
सध्या मंञालयात कार्यरत असलेले नितीन जाधव यांची मंञालय संपर्क प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने निवड झाली.
नितीन जाधव यांनी दै.लोकत तसेच दै.पुढारी या वृत्तपञात राजकीय सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,क्रिडा,आर्थिक विषयावर सखोल वार्तांकन केले आहे.पञकारितेतील उत्कृष्ट लिखाणामुळे त्यांचे बातम्याचे अनेक विषय गाजले होते व शासन दरबारी त्याची नोंद घेतली गेली.ते विज्ञानाचे पदवीधर असुन व्यवस्थापनशास्ञाचे उच्च पदवीधर आहेत संगणकशास्ञात ही त्यांचे कौशल्य आहे तसेच वृत्तपञविद्या विषयाचे ही पदवीधर असुन ते अनेक विषयांत पारंगत आहेत .नितीन जाधव यांचा विविध क्षेञात यशस्वी अनुभव आहे ते मार्केटींग सल्लागार ,कंपनी व्यवस्थापक,शैक्षणिक सल्लागार ,व्याख्यता म्हणून पुणे परिसरात परिचित आहेत.त्यांचेकडे संभाषण कौशल्य असल्यामुळे अनेक व्यासपीठावर ते भाषणकार ,सुञसंचालक तसेच राजकीय रणनितीकार म्हणून उपस्थित असतात . पञकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष असताना त्यांनी चाळीस उत्कृष्ट पञकारांचा राज्य पञकार संघाच्या व्यासपीठावर यथोचित सन्मान केल्याने त्यांचा कार्याचा राज्य संघटनेने विशेष गौरव केला होता.
त्यांच्या ह्याच अनुभवामुळे त्यांना मंञालयात कार्य करण्याची संधी मिळाली.अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाची छाप सोडल्यामुळे महाराष्ट्र राज्य पञकार संघाने त्यांची थेट मंञालय संपर्क प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांचे शी बातचित करताना त्यांनी सांगितले आता कामाची जबाबदारी वाढली आहे .ग्रामीण शहरी पञकारासह ,सामान्यवर्ग यांची मंञालयातील कामे संघटनेच्या माध्यमातून सोपी सुटसुटीत व लवकर करण्यासाठी पुढाकार घेणार आहे .मंञालयात कामानिमित्त येणाऱ्या पञकारांना राहण्यासाठी अङचण निर्माण होते त्यासाठी मुख्यमंञ्याकडे निवासाची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

अधिक वाचा  ठाकरे भाजपाला भिडण्यास तयार ‘मविआ’चा मुंबईतील 20-18-7-1 फॉर्म्युला?; माध्यमाकडे संपुर्ण यादीच आली

त्यांची मंञालय संपर्क प्रमुख पदी निवड झाल्यामुळे पुणे, हवेली ,पिंपरीचिंचवड मुंबई ,उस्मानाबाद,सोलापूर ,ठाणे ,औरंगाबाद,बार्शी,भूम ,परंडा येथिल पञकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्य वर त्यांचे वर अभिनंदनांचा वर्षाव करत आहेत व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.