नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर आता दिल्लीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर काही तरुणांनी ‘देश के गद्दारो को, गोली मारो *** को’ अशी नारेबाजी करण्यात आली. यामुळे वातावरण काहीसं तणावाचं बनलं.
दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दुपारी १२.३० वाजता हा प्रकार घडला. मेट्रोत नारेबाजी करण्याऱ्या सहा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तरुणी राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अचानक ‘देश के गद्दारो को, गोली मारो *** को’ नारे दिले. तरुणांच्या नारेबाजीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजीव चौक मेट्रोस्टेशवरून नारेबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.