मुंबई: गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातून बाजूला फेकले गेलेले व त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा सूर अचानक बदलला आहे. ‘पक्षात राहीन की नाही भरवसा नाही’ असा इशारा काही दिवसांपूर्वीच देणारे खडसे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपमधील सध्याच्या नेत्याचं कौतुक केलं आहे.
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘गेले चार दिवस विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. तिथं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताहेत असं चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीनं सरकारला जाब विचारायचो,’ असं ते म्हणाले.

अधिक वाचा  समान नागरी कायद्याचा संविधानाला नव्हे, आरएसएसला धोका; प्रकाश आंबेडकर