पुणे : मराठवाडा मित्रपरिवार आणि मराठवाडा आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने रेनबो इंटरनेशनल स्कूल लोणी काळभोर याठिकाणी याठिकाणी स्नेहभोजनसह स्नेहमेळावा आणि चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मराठवाड्यातील व मराठवाड्यावर प्रेम असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना रवी पाटील म्हणाले की पाटील म्हणाले की , मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या भागातून उदरनिर्वाहासाठी तसेच शिक्षण ,नोकरी आणि व्यवसायासाठी आलेले अनेक नागरिक आज पुणे शहर व परिसरामध्ये वास्तव्य करत आहेत . पुणे शहर व परिसराने आज अनेकांना जागतिक किर्ती मिळवून दिली. पुणे शहर व परिसराच्या उपकाराची जाण असणाऱ्या सर्व नागरिकांना एकत्रित करून स्नेहमेळावा व विविध विषयावर चर्चासत्राचे आयोजन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील भूमिपुत्रांचा आज विविध क्षेत्रातील कार्यभार हा उल्लेखनीय आहे. अशा भूमिपुत्रांची मराठवाड्यातील नागरिकांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणार्या भूमिपुत्रांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक करणारे विठ्ठल चव्हाण आणि महेश घाटे यांना मराठवाडा उद्योगरत्न, सर्वसामान्यांना रुग्णांना माफक दरामध्ये सेवा देणारे डॉ. ओमकुमार हालिंगे यांना मराठवाडा आरोग्यरत्न, पोलीस प्रशासनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन गुन्हेगारी क्षेत्रावर आळा बसविण्यासाठी सदैव कार्यतत्पर असणारे क्राइम ब्रांच पोलीस सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण आणि पुणे ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मराठवाडा समाजरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी डी पवार, लोकमंगल बँकेचे सल्लागार तथा ज्येष्ठ मार्गदर्शन जनार्धन शिंदे उर्फ मामा, मराठवाडा समन्वय समितीचे संस्थापक राजकुमार दुरगुडे पाटील, प्राध्यापक वेंकटेश रणखांब सर, आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये विविध विषयावर चर्चा होणार असून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे पुणे ,पिंपरी-चिंचवड व परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या नागरिकांची सूची तयार करण्यात येणार आहे. तरी मराठवाड्यातील पुणे परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी कुटुंब व मित्रपरिवारसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी 9822 61 4830, 9822 08 0804 (प्रा.अरुण गाढवे) आणि 7058 6666 06 अशी विनंती मराठवाडा मित्र परिवार संस्थापक रवी पाटील आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक महेश टेळेपाटील यांनी केले आहे.