पुणे : शहरातील शिवाजीनगर पोलीस वसाहत येथे 840 नवीन सेवा निवासस्थानांच्या बांधकाम पालिकेच्या परवानगीमुळे प्रलंबित होते. आता या बांधकामाच्या प्रकल्प प्रकार 2 (672 – आठ इमारती) च्या सेवा निवासस्थानांच्या आठ इमारतीपैकी दोन इमारतीच्या कामास पुणे महानगरपालिकेने परवानगी द्यावी. असा आदेश राज्याच्या गृह विभागाकडून देण्यात आला आहे. अशी माहिती देणारा शासन आदेश प्रसिध्द झाला आहे.

या निर्णयात पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील बैठ्या चाळी पाडण्यात येणार आहे. तसेच त्याठिकाणी 840 नवीन पोलीस सेवा निवासस्थाने बांधण्याच्या प्रकल्पातील आठ इमारतीपैकी दोन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी रमा – पुरुषोत्तम फाऊंडेशन, पुणेच्या वतीने खर्च करण्यात येणार असून त्यात काही अटींचा समावेश करण्यात आला आहे. फाऊंडेशनला हे काम स्व खर्चाने करावे लागणार असून त्यासाठी त्यांना शासनाकडून निधी तसेच इतर साधने देण्यात येणार नाही. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्या नकाशानुसार काम करावे.

अधिक वाचा  ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, कुणा-कुणाला संधी?

याबरोबरच पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित विहित करतील त्या मानकाचे साहित्य व सामान वापरावे. उक्त बांधकाम किंवा बांधण्यात आलेल्या इमारती किंवा उक्त इमारती जिथे बांधण्यात येणार आहे त्या जमिनीवर रमा पुरुषोत्तम फाऊंडेशनचा कुठलाही अधिकार राहणार नाही. आणि या इमारतीच्या बांधकामात फाऊंडेशनला शासनाकडून कोणतीही सोय, सवलत अथवा लाभ देता येणार नसल्याची अट आदेशात नमुद करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक रमा पुरुषोत्तम फाऊंडेशन कार्यालयाने नमुद प्रकल्पातील प्रकार 2 च्या सेवा निवासस्थानांच्या आठ इमारतीपैकी दोन इमारतींचे संपूर्ण बांधकाम, बांधकाम परवानग्यांसाठी येणारा खर्च वगळुन, स्वत:च्या खर्चाने करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. त्यानुसार या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालक यांच्यामार्फत शासनास केली होती. त्यानुसार शासनाने आदेश दिला आहे.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

निर्णयात काय म्हटले आहे?
शहरातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील बैठ्या चाळी पाडून त्या ठिकाणी 840 नवीन पोलीस सेवा निवासस्थाने बांधण्याच्या प्रकल्पातील प्रकार 2 च्या सेवा निवासस्थानांच्या आठ इमारतीपैकी दोन इमारतींचे संपूर्ण बांधकाम, बांधकाम परवानग्यांसाठी येणारा खर्च वगळुन, रमा – पुरुषोत्तम फाऊंडेशन यांनी स्वत:च्या खर्चाने बांधकाम पूर्ण करावे.