मांजरी : येथील संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करुन शिबिराचे उद्धघाटन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थीतामध्ये मांजरी गावचे माजी सरपंच पंढरीनाथ घुले,हडपसर मनसे अध्यक्ष शिवाजी भाडळे,सामाजिक कार्यकर्ते तुळशीरामदादा कुदळे,इंदिरा शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रविद्र गोगावले,आर,पी,आय, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गजेद्र मोरे,पी,डी,सी,बँकेचे माजी व्यवस्थापक दिलीप घुले,साप्ताहीक आपली चळवळ सहसंपादक पितांबर धिवार पुरुष हक्क संरक्षण समिती पुणेचे अध्यक्ष संतोष शिदे, साधना विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुरेश पिसाळ,संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष/शिबिराचे मुख्य संयोजक हरिभाऊ काळे,हवेली तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस उपाध्यक्ष सुनिल शेवाळे, अभिजीत बोराटे,सामाजिक कार्यकर्ते चॉद शेख,सिने अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे,गायक गणेश कदम,सहकार्य प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष किरण तुपे,प्राध्यापक किशोर येवलेकर,के,पी,पँरामेडीकल इन्सिट्युटचे संस्थापक अध्यक्ष कृपाल पलुसकर,व्यसनमुक्तीचे कार्य करणारे वसंत राक्षे,कवी बबनराव जाधव,इत्यादी उपस्थीत होते.
परिसरातील अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
संत गाडगेबाबांचे विचार समाजाने आचरणात आणणे काळाची गरज आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा महान मंत्र समाजाला दिला,त्याची जपणुक करावी असे उद्दगार सुरेश घुले यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना काढले.

अधिक वाचा  प्रजासत्ताक दिन: 'बीटिंग द रिट्रीट' सांगता गाण्याचा वाद काय? आता हे गीत वाजणार

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगिता गवळी,अश्विनी रसाळ,उज्वलाताई काळे,शुभांगी काळे,गोकुळ दळवी,अनिकेत काळे,सोमनाथ काटकर,अनिल पवार,इत्यादींनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केले.