पुणे (दिनेश कुऱ्हाडे) : पुणे महापालिकेच्या महापौर चषक स्पर्धेत आयोजित केलेल्या कबड्डी चषकात महिला गटात ‘शिवशक्ती’ने तर पुरुष गटात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने चित्तथरारक खेळ करत विजेतेपदावर नाव कोरले.राज्यस्तरीय मॅटवरील या स्पर्धेची दिमाखात सांगता झाली.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या महिला गटातील रोमहर्षक अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या सुवर्णयोग स्पोर्ट्स क्लब संघावर (३३-३०) असा अटीतटीचा विजय मिळविला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही शिवशक्ती संघाच्या दुसरी फळीदेखील तितकीच ताकदीने लढली. पुरुष गटातील अंतिम सामन्यात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने मुंबईच्या विजय स्पोर्टस् क्लबचा (४०-१७) असा धुव्वा उडवीत एकतर्फी विजय मिळविला. सामन्याच्या मध्यंतराला चांदेरे संघाकडे (३०-८) अशी आघाडी होती.

अधिक वाचा  छेडछाड मुक्त महाराष्ट्र व्हावा अशी अपेक्षा - खा.सुप्रिया सुळे

पुरुष आणि महिला गटात विजयी संघाला १ लाख ५० हजार रुपये आणि करंडक तर उपविजयी संघाला १ लाख रुपये आणि करंडक असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. तसेच यावेळी ‘उत्कृष्ट पकड’ सन्मान निखिल शिंदे (एनटीपीसी नंदूरबार), प्रतिभा निवंगुणे (सुवर्णयुग स्पोर्टस् क्लब), उत्कृष्ट चढाई अजिंक्य कापरे (विजय स्पोर्टस् ), मानशी रोडे (राजा शिवछत्रपती संघ), सर्वोत्कृष्ट खेळाडू अक्षय जाधव (बाबूराव चांदेरे), रेखा सावंत (शिवशक्ती संघ) यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त मा. शेखर गायकवाड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह श्री. महेशजी करपे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत रासणे, मा.आ.श्री. योगेश टिळेकर, श्री. चंद्रकांत मोकाटे, मा. उपमहापौर श्री.दिपक मानकर, श्री.बाबुराव चांदेरे, श्रीनाथ भिमाले, श्री.वसंत मोरे, श्री. किशोर शिंदे, नगरसेवक श्री. किरण दगडे-पाटील, श्री. दिलीप वेडे-पाटील, श्री. दीपक पोटे, श्री. सुशील मेंगडे, श्री. हरिदास चरवड, श्री. योगेश समेळ, श्री. अमोल बालवडकर, श्री. जयंत भावे, श्री. अजय खेडेकर, श्री. उमेश गायकवाड, श्री. राहुल भंडारे, श्री. महेश वाबळे, श्री. विशाल धनवडे, श्री. बाळा धनकवडे, श्री. सचिन दोडके, श्री. विजय शेवाळे, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. श्रध्दा प्रभुणे, वासंती जाधव, हर्षाली माथवड, सुनिता वाडेकर, लक्ष्मीताई दुधाने, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सौ. मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, माधुरीताई सहस्रबुद्धे, सोनाली लांडगे, पल्लवी जावळे, गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, क्रीडा उपायुक्त संतोष भोर, सहायक आयुक्त किशोरी शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कबड्डीप्रेमी यांची मोठी गर्दी होती. यावेळी मा. नगरसेविका सौ. मोनिका मोहोळ कबड्डी संघांचे स्वागत केले.

अधिक वाचा  किरीट सोमय्यांची मुंबईच्या महापौरांवर टीका ,“काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, व्यवहाराचे पुरावे......

महापालिकेच्या माध्यमातून सामने होत असले, तरी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन या दोन्ही संस्थांच्या विशेष सहकार्याने ही कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत १००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले, तर एकूण ११ हजार खेळाडू पुण्यामध्ये खेळण्यात येणार्‍या महापौर चषकात सहभागी झाले.