पंचवटी: म्हसरूळ परिसरातील पेठरोड येथील इंद्रप्रस्थनगरीत सैन्य दलातील एका जवानाने त्याची पत्नी चैताली सुनील बावा (वय २३) हिचा गळा आवळून खून केला. बुधवारी (दि. २६) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
घरगुती वादातून तिचा पती सुनील बावा (वय ३०) याने तिचा गळा आवळला. त्यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तो सध्या श्रीनगर येथे सैन्य दलात सेवेत असून दहा दिवसांच्या सुट्टीसाठी तो आला होता. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याने चाकूने हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे