मुंबई: आपण सारे रंगभेदाला कळत नकळत सहजपणे खतपाणी घालत असतो. गोऱ्या रंगाला हे शोभून दिसते, ते शोभून दिसते, असं म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतो आहोत, याचा पत्ताही नसतो. हीच मानसिकता जेव्हा समूहाद्वारे व्यक्त केली जाते, तेव्हा त्यातून रंगविद्वेष निर्माण होतो. लग्नासाठी जोडीदार निवडताना देखील गोऱ्या रंगला प्राधान्य दिलं जातं. असं असताना एका तरुणीनं मालिका तरुणीचा सावळ्या मुलाशी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
राणी भुते या तरुणीनं रंगभेदाला बाजूला सारून सावळ्या मुलाशी विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. व्यवसायानं कॉम्प्युटर इंजिनीअर २७ राणी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची चाहती आहे. मालिकनं तिला विचार करायला भाग पाडल्याचं ती म्हणाली. आणि तिनं अनुराग मिसाळ यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं. तिचा हा निर्णय तिनं मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखलेशी संपर्क केला शेअर केला.
सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि मनाचं सौंदर्य चेहऱ्यावर उमटल्याखेरीज राहत नाही. या मालिकेतून हाच विचार मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतेच मालिकेनं १०० भाग पूर्ण केले. या सेलिब्रेशनसाठी मालिकेकडून राणी आणि अनुराग यांना बोलवण्यात आलं होतं.

अधिक वाचा  शरद पवारांच्या नावावरच निवडणूक लढवणार, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचे खंडन