नवी मुंबई : वाट चुकलेल्या असहाय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन तासांमध्ये या पीडित महिलेवर दोन वेळा बलात्कार झाला. यात तीन व्यक्तिंचा सहभाग होता असं आता पुढे आलंय. 19 वर्षीच्या महिलेची नवऱ्यासोबत ताटातुट झाली होती. या महिलेला रेल्वे स्टेशनजवळ सोडण्याचा बहाणा करुन दोन घटनांमध्ये तिच्यावर तीघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नाशिक मध्ये राहणारी पीडित महिला घाटकोपर येथे पतीसह गेली होती. लोकल पकडताना त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर हा सगळ्या घटनाक्रम घडला.
लोकल पकडताना पतीसोबत ताटातुट झाल्यानंतर ही महिला रात्री मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरली. पुढील प्रवास कसा करायचा असा तिच्यासमोर प्रश्न होता. आणि हातात पैसे ही नसल्याने या महिलेने आपले कानातील सोन्याचे दागिने मुंब्रा येथे विकण्याचा प्रयत्न केला. कोणीच ते दागिने विकत घेण्यास तयार नसल्याने तिने एका रिक्षाचालकला विनंती केली. मात्र त्या नराधमाने महापे येथिल निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला आणि दागिने विकून पैसे आणतो सांगून पळून गेला.
आपले दागिनेही गेले आणि पैसेही मिळाले नाही म्हणून या महिलेने पुन्हा स्कुटी वरून जाणाऱ्या दोघांना जवळच्या रेल्वे स्थानकात सोडण्याची विनंती केली. मात्र या दोघांनी घणसोली रेल्वे स्थानकावर सोडण्या ऐवजी हायवे लगतच्या झाडीत नेऊन बलात्कार केला. अखेर या महिलेने घणसोली रेल्वे स्थानक गाठलं आणि इतर प्रवाशांच्या मदतीने ती ठाणे मार्गे नाशिक मधील आपल्या घरी पोहचली.
शेजारी झोपलेल्या मालकाला चादर मागितली तर हाकललं, कामगाराने डोक्यात घातला रॉड
झालेला सर्व प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पीडित महिलेच्या सांगण्यावरून ऑटो रिक्षामधील दोन बाहुल्या आणि दोन झेंड्यांच्या ओळखी वरून तिघाही नराधमांना 24 तासात मुद्देमालासह अटक केलीय. पोलीस पुढील तपास करत आहेत.