दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारी आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश ‘भैय्याजी’ जोशी यांनी गुरुवारी सांगितले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे असे भैय्याजी जोशी म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन रविवारी रात्री उत्तर पूर्व दिल्लीच्या वेगवेगळया भागांमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. बुधवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला होता. दिल्लीत जमावाने एका इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचीही हत्या केली. नाल्यामध्ये या तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबाला जास्त दु:ख झाले आहे. शेजाऱ्यांनी स्थानिक राजकारण्यांना दोष दिला असून, कुठलीही कृती न केल्याबद्दल घोषणा दिल्या. चांद बागसह उत्तर पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये सोमवार-मंगळवार असे दोन दिवस मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला.

अधिक वाचा  मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं अटक