नवी दिल्लीः स्मार्टफोन बनवणारी चीनची कंपनी रियलमी भारतात लवकरच कमी किंमतीतील ५ जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. ही माहिती कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. २०२० पर्यंत कंपनी भारतातील उत्पन्न दुप्पट ३० हजार कोटी रुपये करणार असल्याचे ते म्हणाले. कंपनी स्मार्ट टीव्ही, स्मार्ट ब्रँड, स्मार्ट वॉच आणि अनेक प्रोडक्ट लाँच करण्याची योजना कंपनीने आखली आहे, अशी माहिती त्यांनी इकॉनॉमी टाइम्सशी बोलताना दिली आहे.
रियलमीने ३० हजार रुपयांपेक्षा महाग असलेला पहिला ५ जी स्मार्टफोन लाँच केलेला आहे. परंतु, कंपनी आता वेगवेगळ्या किंमतीतील टेक्नोलॉजीतील सपोर्ट करणारे अनेक डिव्हाइस लाँच करणार आहोत. त्यानंतर आम्ही स्वस्तातील ५ जी स्मार्टफोन लाँच करणार आहोत, ५ जी साठी आमच्याकडे अनेक चिपसेट आहेत. परंतु, आम्ही आधी आमच्या फ्लॅगशिप चिपसेटसोबत सुरुवात करणार आहोत. टेक्नॉलॉजीतील चाहत्यांसाठी फीडबॅकचा अनुभव देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असे माधव सेठ म्हणाले. रियलमी इंडियाने २०१९ मध्ये १४ हजार ७०० कोटी रुपयांची विक्री केली होती. गेल्यावर्षी जवळपास १५० लाख स्मार्टफोनची विक्री केली होती. २०२० मध्ये यात वाढ करून ती ३०० लाख युनिट पर्यंत विक्री करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे माधव सेठ म्हणाले.

अधिक वाचा  अजितदादांचा नवा डाव! यंदा विधानसभेसाठी बारामती नाहीतर या मतदारसंघातून मैदानात उतरणार?