सिडनी : आपल्या आक्रमक फलंदाजीनं सर्वांचे मन जिंकणाऱ्या एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं भारतीय तरुणीची साखरपुडा केला आहे. या आक्रमक फलंदाजाचे नाव आहे ग्लेन मॅक्सवेल आहे. मॅक्सवेलनं भारतीय वंशाची विनी रमन हिच्याशी बुधवारी (26 फेब्रुवारी) साखरपुडा केला. मॅक्सवेलनं आपला आणि विनीचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. या फोटोमध्ये विनी आपली अंगठी दाखवत आहे.
याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वाथ्यामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने, ‘माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझी मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरतर तिचे आभार मानले पाहिजेत”. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.
आजारपणानंतर मॅक्सवेलचा जबरदस्त कमबॅक
ग्लेन मॅक्सवेलने मानसिक तणावातून मुक्त झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जबरदस्त पुनरागमन केले. बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेलने मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व केले आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. बिग बॅश लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 16 सामन्यात मॅक्सवेलने 398 धावा केल्या. त्याची सरासरी 39.80 होती आणि स्ट्राइक रेटही जवळपास 150 च्या आसपास होता. लीगमध्ये मॅक्सवेलने 28 चौकार आणि 20 षटकार लगावले. बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेलने जोरदार फलंदाजी केली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौ ऱ्या त्याची निवड झाली परंतु डाव्या हाताच्या कोपरात दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. मॅक्सवेलला आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त रक्कम देऊन विकत घेतले होते. मात्र मॅक्सवेल आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे.

अधिक वाचा  ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात