बीड : महाराष्ट्रातील तब्बल 4 हजार शाळांमधील 40,000 शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीय. यामुळे येत्या दहावी बारावीचा निकालावर याचा परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. यासंदर्भात आज महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीने बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात तसे पत्रही कढण्यात आले आहे यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्‍न रखडलेल्या आहेत त्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही यामुळे शिक्षकाने आक्रमक पवित्रा व भूमिका स्पष्ट केली यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे
या आहेत शिक्षकांच्या मागण्या
1) 40% अनुदान निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा.
2) चलीत नियमानुसार अनुदानाचा टप्पा देण्यात यावा.
3) विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे.
4)अघोषित शाळांना तात्काळ निधीसह अनुदान घोषित करण्यात यावे.
त्यामुळे महाराष्ट्रातील दहावी बारावीच्या निकालाचं गणित चुकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरु झालीय. राज्यातील 12 लाख 5 हजार 27 विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी 3 लाख 39 हजार विद्यार्थी हे मुंबईसह उपनगरांमधील आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी 500 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे.

अधिक वाचा  ब्लू प्रिंट, विधानसभा ते सरकारच्या योजनांपर्यंत…; कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं?