पुणे : पुणे येथील बालाजीनगर, धनकवडी, सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गरीब,कष्टकरी उत्तर भारतीय बांधवांना बांगला देशाचे असल्याचे भासवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी जो नाहक त्रास दिला जात आहे , तो राजकीय स्टंटबाजी आहे ती त्वरित थांबवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी निवेदनाद्वारे पुण्याचे पोलिस आयुक्त यांना केली.

CAA ( Citizen Amendment Act – सुधारित नागरिकत्व कायदा ) च्या अनुषंगाने आज शेतकरी कामगार पक्ष पुणे शहराच्या वतीने निषेध नोंदवून कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता त्याच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन उपायुक्त नितेश घट्टे यांना निवेदन देण्यात आले.

अधिक वाचा  EVM घोळाबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

मनसेच्या कार्यकर्त्यांना हा अधिकार कोणी दिला. मनसे कार्यकर्त्यांनी स्वता:ला पोलिस किंवा न्यायाधीश समजू नये.योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि कायदा आहे असे मत सागर नामदेव आल्हाट निवेदनात म्हटले आहे.
यावेळी खालीद सय्यद, शरद ओव्हाळ, युनुस खान,जावेद शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.