मुंबई : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ अद्याप संपलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय मध्यंतरीच्या काळात आलेला कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या सिनेमाच्या रिलीजला आता जवळापास 46 दिवस पूर्ण झाले आहेत आणि यासोबतच या सिनेमानं जागतिक स्तरावर नवा विक्रम केला आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चौथा बॉलिवूड सिनेमा ठरला होता.

सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ सिनेमानं 46 दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम राखला आहे. या सिनेमानं 46 दिवसांनंतर 276 कोटींची कमाई करत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुलार गुड न्यूजनं जागतिक स्तरावर 304 कोटी कमावले होते. त्यानंतर रिलीज झालेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमानं आतापर्यंत 350 कोटीं रुपयांची कमाई केली आहे. म्हणजे या सिनेमानं गुड न्यूजलाही मागे टाकलं. सिनेमा रिलीज झाल्यावर या सिनेमानं प्रति दिवस 50 ते 60 लाखांची कमाई केली होती.

अधिक वाचा  मयुर कॉलनी डिव्हायडर उंची कमी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोथरूड सहायक आयुक्तांना निवेदन

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तान्हाजी’ सिनेमानं फक्त जानेवारीतच नाही तर फेब्रुवारीतही दमदार प्रदर्शन केलं. या सिनेमानंतर रिलीज झालेले ‘पंगा’, ‘जवानी जानेमन’, ‘मलंग’, ‘लव्ह आजकल’ सारखे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नव्हते. यासोबतच या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘तान्हाजी’ हा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाची महाराष्ट्रात वेगळीच जादू पाहायला मिळाली.
देशभरात CAA आणि NRC चा वाद सुरू असतानाही ‘तान्हाजी’ सिनेमाच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. जागतिक स्तरावर अशी सर्वाधिक कमाई करणारा ‘तान्हाजी’ हा चौथा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या सिनेमात शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे, अमेय वाघ, शशांक शिंदे हे मराठी कलाकारही आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे.