मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाट बसणार आहे. १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरील टोल दरात वाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे. महामंडळानं नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारसाठी सध्या २३० रुपये टोल आकारला जात आहे. तो १ एप्रिलपासून २७० रुपये आकारला जाणार आहे. ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ४९३ रुपये टोल आकारला जात असून, नव्या दरानुसार ५८० रुपये आकारण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सकडून एमआरडीसीला ८, २६२ कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. उर्वरित रक्कम हप्त्यानं दिली जाणार आहे. त्याबदल्यात पुढील १५ वर्षे टोल वसुली करण्याचे अधिकार ‘आयआरबी’ला असणार आहेत.
असे असतील नवे दर!
वाहन सध्याचे टोल दर नवे दर (१ एप्रिलपासून)
कार २३० रुपये २७० रुपये
मिनी बस ३५५ रुपये ४२० रुपये
ट्रक ४९३ रुपये ५८० रुपये
बस ६७५ रुपये ७९७ रुपये
अवजड वाहने ११६८ रुपये १३८० रुपये
क्रेन १५५५ रुपये १८३५ रुपये

अधिक वाचा  शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले…