‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे हे मराठीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत अशी माहिती समोर आली. प्रवीण तरडे हे एका चित्रपटासाठी ५० लाख रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती होती. ही माहिती कितपत खरी आहे याबद्दल खुद्द त्यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
विशेष मुलाखतीत ते म्हणाले, “मी फार गरीब कुटुंबातून वर आलोय. दहा बाय दहाच्या खोलीत मी राहायचो. मला यावर्षी सगळ्यात जास्त मानधन मिळालं. पण हे फक्त अभिनयाचं नाही. त्यात कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या गोष्टींचाही समावेश आहे. म्हणून माझं मानधन जास्त आहे. पण ते कष्टातूनच आलंय. सिनेमे चालतायत, म्हणून मानधन वाढतंय.” लेखक म्हणून चांगलं मानधन मिळाल्याचं समाधान जास्त असल्याचं ते सांगतात. ‘कुंकू’, ‘पिंजरा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘कन्यादान’ या मालिकांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन हे त्यांनी केलं आहे. या सिनेमात त्यांनी नन्याभाई हे पात्रही साकारलं होतं. ‘देऊळ बंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केलं आहे.

अधिक वाचा  टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश, दुसऱ्या कसोटीत 7 विकेटने नमवलं