मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. या सर्व जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे.

३० मार्चपूर्वी ही निवडणूक पार पाडायची असल्याने मतदानासाठी आयोगाने २६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. ६ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असेल. १६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून १८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असेल.

अधिक वाचा  मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार, पण मनोज जरांगेंना मान्य नाही; म्हणाले…