अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात जंगी स्वागत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर डोनाल्ड ट्रंप यांचं भाषण झालं. भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सर्व जगाला अभिमान आहे आणि भारताची प्रगती ही सर्व जगासाठी प्रेरणादायी आहे असं बोलून ट्रंप यांनी उपस्थितांची मनं जिंकली पण काही भारतीय शब्द उच्चारताना ते अडखळले. भाषणावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नावाचा उच्चार केला. स्वामी विवेकानंद हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचं ते म्हणाले पण विवेकानंद यांचं नाव त्यांना व्यवस्थितरीत्या घेताच आलं नाही. स्वामी विवेकामनन असं अडखळत त्यांनी नाव घेतलं.
तसेच त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सचिन तेंडुलकरचं नाव सूचिन तेंडुलकर असं घेतलं यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. भारतात 2000 हून अधिक चित्रपट दरवर्षी येतात. बॉलिवुडची जादू फक्त भारतावरच नाही तर जगावर आहे असं देखील ते म्हणाले.
क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू या देशातलेच आहेत. विराट कोहली आणि सूचिन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर) हे दोघे महान क्रिकेटपटू असल्याचं ते म्हणाले.

अधिक वाचा  बार्शी 'फटे' स्कॅम! फरार विशाल फटे अखेर करणार आत्मसमर्पण !

ट्रंप यांच्या भाषणातले 10 मुद्दे
1. ट्रंप नरेंद्र मोदींना म्हणाले तुम्ही फक्त गुजरातचे भूषण नाहीत, तुम्ही मेहनत, निष्ठा यांचे मूर्तीमंत प्रतीक आहात. भारतीय तुमच्याकडे आदर्शवत भारतीय म्हणून पाहू शकतात. तुमचे पंतप्रधान हे अतुलनीय कर्तबगारीचं खरंखुरं उदाहरण आहे.

2. पाच महिन्यांपूर्वी टेक्सासमधल्या एका भव्य स्टेडियमध्ये अमेरिकेने हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. भारताने अहमदाबाद इथं आमचं भव्य स्वागत केलं.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहावाला म्हणून काम केलं. प्रत्येक भारतीय त्यांच्यावर प्रेम करतो परंतु ते अतिशय महान नेते आहेत. भारताची लोकशाही विलक्षण आहे. भारतीय लोक एकदा जे मनात आलं ते करून दाखवतात याचं उदाहरण म्हणजे मोदी आहेत.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

4. जगभरातले लोक बॉलीवूडचे चित्रपट प्रेमाने बघतात. भांगडा, क्लासिक चित्रपट डीडीएलजे, शोले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे भारताची शान आहेत.

5. सुरक्षा विषयक करारांबात ट्रंप म्हणाले मिलिटरी हेलिकॉप्टरसंदर्भात 3 बिलिअन बिलिअन रकमेचे करार होतील.

6. कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करत आहेत. माझ्या प्रशासनाने अमेरिकेच्या लष्कराने आयसिसचा खात्मा करण्याचा चंग बांधला आहे. आयसिसचा सगळ्यात मोठा तळ आम्ही उद्धस्त केला. अल बगदादीला आम्ही ठार मारलं.

7. लष्करी सहकार्याचा भाग म्हणून भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मदत केली जाईल. भारताचं लष्कर जगातल्या सर्वोत्तम लष्करापैकी एक आहे.

अधिक वाचा  ओमिक्रॉनवर येत आहे पुण्यात पहिली स्वदेशी लस

8. पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधला तणाव निवळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पाकिस्तानसोबत अमेरिकेची चर्चा सुरू असून दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. असं ते म्हणाले.

9. अमेरिकेत 40 लाख भारतीय आहेत. त्यापैकी 25 टक्के लोक गुजराती आहेत आणि त्यांनी अमेरिकेच्या भरभराटीत मोठं योगदान दिलं आहे.

10. भारत सर्वधर्मसमभावाचं प्रतीक आहे. भारतात, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या धर्मांचे लोक एकत्र नांदतात. भारतात 100 हून अधिक भाषा बोलल्या जातात तरी भारत एक आहे असं ट्रंप म्हणाले.