पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणात वाढ होत आहे. सोसायटीत विनापरवाना भाजीविक्रेत्याला हटकले असता त्याने पैलवान बोलवून सभासदांना मारहाण केल्याची घटना कात्रजमध्ये घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरातील गणंजय सोसायटीत काही पैलवानांनी सोसायटीतील सभासदांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या सोसायटीत विनापरवाना एक भाजीविक्रेता भाजी विकत होता. सोसायटीतील सदस्यांनी त्या भाजीविक्रेत्याला विनापरवाना भाजी विक्री करु नये, असं सांगितलं. सदस्यांनी आपल्याला असं सांगितल्याचा त्याचा राग मनात ठेवून त्याने काही पैलवानांना सोबत आणले आणि सभासदांना मारहाण केली. लाठ्या काठ्याने सभासदांना मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर या गुंडांनी तेथिल डेअरीची तोडफोडही केली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा पैलवानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीत रात्री झालेली मारहाण दिसत आहे. या आधारे भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

अधिक वाचा  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र