देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागावे असा खोचक सल्ला शिवसेनेने दिला आहे. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही शिवसेनेने घेतला आहे.

भय्याजी जोशी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत. या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाला गुदगुल्या झाल्या, पण महाराष्ट्रात असं काही घडणार नाही. देवेंद्रजी तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा असे आम्ही सुचवत आहोत असं शिवसेनेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘योग साधनेत ज्ञानसाधनेचा पाया’ पेरिविंकल शाळेत विद्यार्थ्यांसह अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनीही घेतले ‘योग’चे धडे