मेरठ : उत्तर प्रदेशमधील मेरठ (Meerut) शहरात एक नवरा आपल्या पत्नीच्या प्रेमात घरातच खड्ड खणत होता. परंतु, याची माहिती शेजाऱ्यांना कळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि गोंधळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीची समजूत काढली. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास तयार झाले.
घडलेली हकीकत अशी की, मेरठ शहरातील लिसाडी गेटजवळील मोबीन नगरमध्ये ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या सिराज यांची पत्नी सईदा (50) 1 फेब्रवारी रोजी राहत्या घरात आग लागल्यामुळे 50 टक्के भाजली होती. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सिराज हे पत्नीला घरी घेऊन आले. त्यानंतर घरीच त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादम्यान, या महिलेनं रविवारी अखेरचा श्वास घेतला.
पत्नीच्या मृत्यूमुळे सिराज यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. सिराज यांना आपल्या पत्नीने आपल्यापासून दूर जावूच नये, असं वाटतं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह हा घरातच दफन करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी घरातील दिवाणखान्यात खड्डा खोदण्याचे काम सुरू केले होते. जवळपास खड्डा हा पूर्णपणे खोदण्यातही आला होता. परंतु, याची कुणकुण शेजाऱ्यांना लागली. त्यानंतर लोकांनी धाव घेऊन त्यांची समजूत काढली. पण तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रात्री उशिरा पत्नीच्या मृतदेहावर दफनविधी करण्यास तयार झाले. त्यानंतर जवळील स्मशान भूमीत त्यांच्या पत्नीचा मृतदेह दफन करण्यात आला.
आठ महिन्याच्या बाळाच्या रडण्यामुळे समोर आला आईच्या हत्येची घटना, पती फरार
दरम्यान, भिवंडी शहरातील श्रीरंगनगर परिसरात राहणाऱ्या पती- पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने आठ महिन्याच्या बाळासमोरच पत्नीच्या गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. सपना अरविंद केशरवानी ( वय 27 ) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव असून बाळाच्या रडण्यामुळे हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पदमानगर भागातील श्रीरंगनगर येथील इमारतीत मयत सपना पती अरविंद पुरुषोत्तम केसरवानी याच्यासोबत राहत होती. अरविंद हा वेताळपाडा इथं ओम साई नावाचे मोबाईल दुकान चालवत होता. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले असता संतप्त झालेल्या पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नी सपनाच्या गळ्या भोवती ब्लॅंकेट आवळून आणि तोंडावर उशी दाबून तिची हत्या करून तो पसार झाला. त्यांना एक मुलगी आणि आठ महिन्याचा मुलगा असून मुलगी गावी आहे. मात्र, हत्या झाल्यानंतर आठ महिन्याचा मुलगा रडू लागल्याने त्याचा आवाज शेजारील नागरिकांना आला असता त्यांनी पाहणी केली. मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुलूप तोडून पाहणी केली असता सपना यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
या अगोदर सुद्धा अरविंदने सपना हिला मारहाण केली होती. या प्रकरणी पतीवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र, गोडी गुलाबीने तो गुन्हा सपना हिला मागे घेण्यास भाग पाडलं होतं. आरोपी अरविंद हा सपना सोडण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  1 च खासदार तरी मांझींना कॅबिनेट, 7 खासदारांच्या शिवसेनेला एकही नाही? केंद्रातील कॅबिनेटवरुन खदखद