नवी दिल्ली : नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) च्या निषेधार्थ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचारानंतर शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये कोणत्याही वर्गाच्या परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील असं सिसोदिया (Manish Sisodiya) म्हणाले आहेत.
सिसोदिया यांनी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याशीही बोलले आणि जिल्ह्यातील बोर्ड परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्र्यांनी ट्वीट केले की, “दिल्लीत, हिंसाचाराचा परिणाम उत्तर पूर्व जिल्ह्यात झाला. मंगळवारी शाळांमध्ये परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील. बोर्डाच्या परीक्षांच्या संदर्भात, मी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्याशी बोललो आहे की उद्या या जिल्ह्यातील बोर्ड परीक्षादेखील पुढे ढकलण्यात याव्यात. ‘
हिंसाचारामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
नागरिकता सुधार कायद्यात (CAA) विरोधात सोमवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पूर्वोत्तर दिल्लीत हिंसाचार सुरू होता. सकाळी सीएएविरोधात निदर्शने करणारे लोक आणि समर्थक समोरासमोर भिडले. हिंसक चकमकीत आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली आणि अनेक गाड्यांना आग लावण्याबरोबरच दुकानांचीदेखील तोडफोड केली गेली. रात्री उशिरा दुचाकींनी गोकुळपुरी टायर मार्केटला आग लावली. या घटनेत हेड कॉन्स्टेबलसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पोलिसांसह 56 लोक जखमी झाले. जखमींना जीटीबी व इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
केजरीवालांनी अमित शहा यांना केले आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निदर्शने आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थन दरम्यान इशान्य दिल्लीतील काही भागातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली. त्यांनी ट्विट केले की, ‘दिल्लीतील काही भागात शांततेत अडथळा येत आहे. मी आदरणीय उपराज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री यांना विनंती करतो की, शांतता व समरसता सुनिश्चित करताना कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करा. कोणालाही वातावरण खराब करण्यास परवानगी देऊ नये.’
दिल्ली हिंसाचार विरोधात मुंबईत आंदोलन
दिल्ली हिंसाचार विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री काही लोक आंदोलनाला बसली होती. हे प्रदर्शन शांतूपर्वक होतं. यावेळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यातदेखील घेतलं. मुंबई पोलीस डीसीपी संग्राम सिंह निशानदर यांच्या मते आंदोलनाची जागा आझाद मैदान आहे. मात्र, काही आंदोलनकर्ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊ लागले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनकर्ते मरीन ड्राईव्हकडे गेले. त्यामुळे जवळपास 25 ते 30 लोकांना ताब्यात घेतल्यांची माहिती निशानदार यांनी दिली.

अधिक वाचा  मॅग्मा एचडीआयचा – “वनप्रोटेक्ट” आधुनिक वैयक्तिक अपघात विमा