पुणे : जिल्हा विशेष लेखा परिक्षकास 50 हजाराची लाच घेताना अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी दिला आहे.
याप्रकरणी एका खासगी लेखा परिक्षकाने तक्रार दाखल केली होती. भगवंत नारायण बिडगर, (56-, पद -श्रेणी -1,(वर्ग -3)जिल्हा विशेष लेखा परीक्षक , सहकारी संस्था, कार्यालय , पुणे.) असे आरोपीचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे आणि ऍड. किर्ती घोरपडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्याने 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागितली होती.
यापैकी तीन लाख रुपये त्याला अगोदर देण्यात आले होते. तर उर्वरीत 75 हजारापैकी 50 हजार शनिवारी घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार हे प्रमाणित लेखा परिक्षक असून त्यांनी संथेच्या नेमणुकीनुसार सहकारी पतसंस्थेचे ऑडीट केले होते.
त्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये तक्रारदार यांना फौजदारी कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. तीन लाख रुपये घेतल्यानंतर उर्वरीत रक्कमेतील 50 हजार स्विकारताना त्याला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले.
ही कारवाई लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बिडगर याच्या विरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

अधिक वाचा  महायुती आणि महाविकास आघाडी विरोधात परिवर्तन आघाडी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढविणार