वेलिंग्टनः न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखून मात केली आहे. न्यूझीलंडनं मालिकेत १-०अशी आघाडी मिळवली आहे.
सामन्यात सलग दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज फारशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावां केल्या. ज्यामुळं न्युझीलंडला विजयासाठी फक्त ९ धावांचे आव्हान होतं. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. हा भारतासाठी पहिला धक्का होता. यानंतर एकामागोमाग भारताचे सर्व फलंदाज माघारी परतले.
ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हे अखेरच्या फळीतील फलंदाज डाव सावरुन नेतील अशी आशा असतानाच दोघांचाही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागणं अवघड होतं.

अधिक वाचा  टेकड्या जाळणाऱ्या विकृतींना चाप बसवा; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला संताप