बुलडाणा : एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. वारीस पठाण यांना त्यांच्या विधानावर अनेक नेत्यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र वारीस पठाण यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या नादात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचीही जीभ घसरली आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वारीस पठाण यांच्याबद्दल ‘देशद्रोही लांड्या’ असे आक्षेपार्ह भाष्य केलं आहे. तसंच ‘आतापर्यंत तुम्ही तुमच्या बायका घरात ठेवल्या. त्या बायकांना गुलाम बनवून ठेवलं. त्यांना कधी बाहेर येऊ दिले नाही. त्यांना सांगितलं गेलं की मिलेट्री येणार, तुम्हाला घरातून बाहेर काढणार, तुम्हाला देशाबाहेर हकलणार, असं खोटं सांगून बाहेर आणलं. आता त्याने सांगितलं 15 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूवर भारी पडतील असाच बोलला ना. पण तू विसरलात वारीस पठाण शिवरायांचा मावळा तुझ्या लाखाची फौज असेल तर 500 मावळे तुझ्या लाखाच्या फौजेला चीत पाडायचे हे तू विसरला आणि आजही शिवरायांची जमात या राज्यात जिवंत आहे,’ असं आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मीच विधानसभेत येतो आणि….’
आमदार संजय गायकवाड यांनी वारीस पठाण यांना थेट आव्हान दिलं आहे. तू 15 कोटीची गोष्ट काय करतो. मी सोमवारी तुला विधानसभेत भेटतो. असेल तिथं दाखव मला 15 कोटीची काय गोष्ट करतो, उभा नाही फाडला तर संजय गायकवाड एका बापाची औलाद नाही. तसेच तुझी जशी जीभ चालते तशी आमची तलवार चालते,’ असे आमदार गायकवाड यांनी मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी वादग्रस्त विधान केले आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर संपुष्टात, मोमिनुल हकची चिवट खेळी