पुणे: ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब,दिन-दलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे तळमळीने उच्चाटन करणारे गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून १४४ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. स्व.अर्जुनराव बनकर (बुवा फुलवाले) स्मृती प्रतिष्ठान, सत्यशोधक गेनूजी सातव स्मृती प्रतिष्ठाण,जन गर्जना मंच,इंदूबाई वाडकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदेमनाने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राजेंद्र ढवळे, मुकेश वाडकर यांनी गाडगे बाबा यांचे संपूर्ण जीवनचरित्र आपल्या मनोगतातुन मांडले.
यावेळी भागूजी शिखरे,सुनील भालके,विकास दळवी,राहुल कांबळे,नगरसेवक योगेश ससाणे,संजय सातव,गणेश वाडकर,राजेश शेलार,मोहन चिंचकर,रणजित चव्हाण,महेश ससाणे,अनिल व्हावळ,अजय,शिंदे,अर्जुन घोडके,महेश ननावरे,सतीश शिंदे,सचिन जगताप,जयप्रकाश जाधव,विवेक तुपे,संजय आमनदे, सतीश भिसे,विश्वास कावरे,तुषार हिंगणे,दिलीप कदम,हणू जाधव,गजानन शिंदे,चंद्रकांत टिळेकर,विशाल तोडकर,विलास शेलार,विक्रम आल्हाट,कवीतके सर,सुभाष शिंदे,मुरलीधर शिंदे,भाऊसाहेब माकर,गौतम तुरेराव,छाबाजी येवले,विनोद करपेकर आदी नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बनकर यांनी केले आभार विठ्ठल सातव यांनी केले.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री