नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (USA President, Donald Trump) 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प हे आपल्या परिवारासह भारतात येत आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबादपासून ते आग्र्यापर्यंतचा त्यांचा दौरा खास बनवण्यासाठी तयारीमध्ये कोणतीच कमतरता राहू नये याची खबरदारी घेतली जातेय. दिल्लीतील शानदार असलेल्या आयटीसी मौर्य (ITC Maurya Hotel) हॉटेलचं प्रशासनही ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला यादगार बनवण्यासाठी जोरदार तयारी करतं आहे. जवळपास साडे चार हजार चौरस फुटांचा Grand Presidential Suite सर्व तयारीने सज्ज आहे. तिथं असणाऱ्या प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये खास ‘ट्रम्प थाळी’ बनवली जाणार आहे.
हॉटेलमध्ये ट्रम्प यांचं असं होईल स्वागत – दिल्लीतील आयटीसी मौर्या हे हॉटेल परदेशातून येणाऱ्या प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तींची पहिली पसंती असते. आता अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांच्या खातरदारीची जबाबदारीही याच हॉटेलला मिळाली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबर सुंदर अशा रांगोळीसोबत भारतीय वेषभूषा केलेल्या महिला ट्रम्प यांचं स्वागत करतील.
या लॉबीमध्ये स्वागत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प थेट 14 व्या मजल्यावर बनवलेल्या Grand Presidential Floor वर पोहोचतील. तिथल्या चाणक्या सुटमध्ये राहण्याची खास सोय करण्यात आली आहे. या सुटमध्ये (Suite) प्रायव्हेट प्रवेशद्वार आहे आणि प्रायव्हेट हाय स्पीड एलिवेटर सुद्धा आहे.
एका रात्रीचं भाडं आहे इतकं – या Grand Presidential Floor वर 4800 चौरस फुटांमध्ये चाणक्य सूट (Suite) तयार करण्यात आला आहे. एका रात्रीसाठी तब्बल 8 लाख रुपयांचं भाडं यासाठी मोजावं लागणार आहे. या सूटमध्ये 2 बेडरूम आहेत. तर आलिशान लिव्हिंग रुम आणि सिल्क पॅनेलवाल्या भितीं, डार्क वूडवाल्या फ्लिरिंगसुद्धा इथे आहेत. पिकॉक थीमवर 12 सीटर प्रायव्हेट डायनिंग रुम, आधुनिक स्पा आणि जिमसुद्धा इथं आहे. प्रदूषणाच्या बाबतीतही मोठी काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी लॉबीमध्ये एक खास डायनामिक प्लाक लावण्यात आला आहे. प्रत्येक्ष क्षणाक्षणासंबधी प्रदूषणाची माहिती देतो आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षण कायदा फक्तं फार्सचं? ‘विशेष’तयारीत सरकार…. जरांगे अन्  ॲड.गुणरत्न सदावर्तेही!