सांगली : जलयुक्त शिवारपासून जेवढ्या चौकशा लावायच्या त्या लावा पण त्याचे हवाल लवकर जनतेसमोर आणा, चौकशांना आम्ही घाबरत नाही असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
झोपेतही सावधपणे काम करणारी आम्ही माणसे आहोत, तेव्हा आम्हाला चौकशीची भीती घालू नका असं पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाशिवाय अन्य कसलीही माफी आघाडी सरकारने दिलेली नसल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली.
सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात विधीमंडळात आवाज उठवला जाईल, तसेच रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
शरद पवारांसह अनेक नेत्यांचा घटनेवर विश्वास आहे पण घटनेप्रमाणे चालणाऱ्या यंत्रणेला विरोध करायचा असं सध्या सुरू असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

अधिक वाचा  भाजप पुण्यात वापरणार ‘हे’ अस्त्र?; सर्वाधिक ४.५ लाख मतदार, प्रथम नगरसेवक ते १४ नगरसेवक ही बलस्थाने