पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मराठा टायगर फोर्स च्या संयुक्त विद्यमानाने हडपसरमध्ये शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती निमित्त हडपसर व परिसरात शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या प्रमाणे घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना एकूण सहा विभागात विभागवार प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शेखर पाटील यांचे व्याख्यान झाले. विविध क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणारे रोहिणीभोसले यांना राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ गौरव पुरस्कार,कैलास आवारी याना छत्रपती शिवाजी महाराज समाज गौरव पुरस्कार, डॉ आशिष डुंगरवाल यांना छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार, विशाल सातव पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज शंभू गौरव पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले. सागर चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्यामुळे नागरी सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा  धक्कादायक, मुंबईत घरी मागवलेल्या आईसक्रीममध्ये निघाले कापलेले बोट, काय आहे नेमकं प्रकरण

यावेळी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे , मनोज गायकवाड, मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष रघुवीर तुपे, स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, सविता मोरे, सतीश जगताप,बाबासाहेब शिंगोटे, बी डी खांदवे,रामकुमार अगरवाल, दीपाली कवडे,सुनंदा देशमुख,प्रांजली चौधरी, विवेक तुपे, रमजान शेख,महेश टेळेपाटील, बाबा लोंढे पाटील,मुकेश वाडकर,दीपक अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा टायगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रदेश उपाध्यक्ष निलेश काळे पाटील यांनी सूत्रसंचालन तर विशाल लहाने पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मराठा टायगर फोर्स चे प्रदेश संघटक नामदेव निकम, पुणे शहर अध्यक्ष अक्षय भोसले,शरद वारे, अमोल घाडगे,अभिजित भाट, तात्या घिगे, नितीन जाधव, राम शिंदे, नवनाथ गुंजाळ, धनंजय शेवाळे, अमोल जाधव, उमेश शिंदे, अशोक देशमुख, राजू वारे, अशोक खांडे, सचिन कराळे,सुनील पवार,अरविंद भोसले, आकाश वीर, मयूर माने यांनी कार्यक्रमसाठी परिश्रम घेतले. यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.