पुणे : राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्याने आता त्यावरून सगळ्याच पक्षात रस्सीखेच सुरू झालीय. भाजपचे सहयोगी सदस्य असलेले संजय काकडे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीवर दावा ठोकलाय. मागच्या वेळी मी सहयोगी सदस्य होतो. यावेळी मी भाजपकडून इच्छुत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावरून त्यांनी माजी खासराद उदयनराजे भोसले यांच्यावरही तोफ डागली. उदयनराजे हे नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. त्याचं योगदान मोठं नाही. ते भाजपमध्ये आले, निवडणुकीला उभे राहिले आणि पडले असं काकडे म्हणाले.
मी उत्तम काम केलं असून मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. उदयनराजे यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत नाही असंही ते म्हणाले. मी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस आहे. भोसले आहेत म्हणून ते माझ्या पेक्षा सरस ठरत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. ते महाराज आहेत. मी देवेंद्र यांचा मोहरा आहे. फडणवीस हेच माझे मोदी शहा आहेत असंही त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा
आधी राष्ट्रवादीच्या जवळ असलेले आणि नंतर 2014मध्ये लोकसभेत मोदी सरकार आल्यानंतर काकडे हे भाजपच्या जवळ गेले. मात्र गेली काही वर्ष ते सातत्याने वादग्रस्त विधानं करत चर्चेत राहिले. विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पुन्हा राष्ट्रवादीत परत जातील असंही म्हटलं गेलं. मात्र ते भाजपमध्येच राहिले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोट निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचा भाजपचा विचार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिकाम्या होत आहेत.
परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पीकर बंद करा, शिवसेना नेत्याचं गृहमंत्र्यांना
त्यात भाजपकडून दोन जागा निवडून येवू शकतात. त्यात एक जागा रामदास आठवले आणि दुसरी जागा उदयराजे भोसले यांना देण्याचा भाजपचा विचार आहे.

अधिक वाचा  “बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार