हडपसर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे  हडपसर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अविनाश मगर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. अविनाश मगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे पाटील व मा.उपमहापौर निलेश मगर यांचे माजी व्यवसायिक भागीदार तसेच हडपसर परिसरातील युवा उद्योजक आहेत. हडपसर-मगरपट्टा परिसरात विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

भविष्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर परिसरात पक्ष तळागाळात बळकट होण्यासाठी काम करणार असल्याचे यावेळी अविनाश मगर यांनी प्रसारमध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, शहरअध्यक्ष जगदीश मुळीक,हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी,सभापती भूषण तुपे, शहर सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक उमेश गायकवाड, धनराज घोगरे, विरसेंन जगताप, नगरसेविका  उजवला जंगले, वृषाली कामठे, रंजना टिळेकर, मनीषा कदम, रवी तुपे,सरपंच शिवराज घुले आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  जिओ वर्ल्ड सेंटर लग्नाची धामधूम 100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 पाहुणे, 2500 कोटींपेक्षा जास्त खर्च