गुलबर्गा : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल, असं वक्तव्य केलं आहे. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.
वीटेचं उत्तर दगडाने उत्तर देऊ, आता तर वाघीणी बाहेर आल्या आहेत, आम्ही सर्व एकत्र आलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये माजी आमदार वारीस पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. ओवेसी बंधुंना महाराष्ट्रात येण्यास बंदी केली पाहिजे, वारीस पठाण यांना देखील जेलमध्ये टाकलं पाहिजे, असं मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज्यात 27 हजार कोटी खर्च करुन बसणार नवे स्मार्ट मीटर; मोबाईलप्रमाणेच ऑनलाइन रिचार्ज