मुंबई: लष्कराच्या दक्षिण कमांडच्या शौर्य व सेवा पदकांचे गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात वितरण झाले. या कार्यक्रमात चार मराठी अधिकारी-सैनिकांना शौर्य आणि सेवा पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं.
दक्षिण कमांडच्या एकूण ५० पैकी २३ शौर्य पदकांचं आणि सेवा पदकांचं वितरण आज, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांच्या हत्ये करण्यात आले. शौर्य पुरस्कारांवर कमांडोजचा बोलबाला दिसून आला. जवळपास आठ पदके कमांडोजना प्रदान करण्यात आली. यावेळी चार मराठी अधिकारी-सैनिकांनाही पदकं देऊन गौरवलं.
कर्नल धनंजय भोसले यांना शौर्य सेना पदकानं सन्मानित करण्यात आलं. सियाचीन ग्लेशियरला अडकलेलं ध्रुव हेलिकॉप्टर यशस्वीरित्या दुरुस्त करून उड्डाण केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. मेजर जनरल नितीन इंदुरकर यांना विशेष सेवेबद्दल पदक देऊन गौरवण्यात आलं. ते मूळचे नागपूरचे आहेत. सर्जिकल स्ट्राइकवेळी जम्मूच्या १६ कोर मुख्यालयात ते तैनात होते. तर इंजिनीअर्स तुकडीतील लेफ्टनंट कर्नल शशिकांत वाघमोडे, सुभेदार पांडुरंग भोसले यांनाही पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं.
बेळगावातील मराठा लाइट इन्फ्रंटी प्रशिक्षण केंद्राला दक्षिण कमांड प्रमुख विशेष पुरस्कार देण्यात आला. तर पुण्यात तैनात गोरखा रेजिमेंटला सांगली आणि कोल्हापुरातील पूरपरिस्थितीत विशेष कार्य केल्याबद्दल विशेष सेवा पुरस्कारानं गौरवलं गेलं.

अधिक वाचा  सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक; शौर्य पुरस्कार ३८४ जणांनाजाहीर