पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती फुरसुंगी गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “शिवराय मनामनात , शिवराय घराघरात” हे ब्रीद घेऊन अखिल फुरसुंगी जन्मोत्सव समिती च्या वतीने सालाबादाप्रमाणे वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त फुरसुंगी गावकऱ्यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी फुरसुंगी गावच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अश्वारूढ पुतळ्याची सुरेख, सुंदर आणि तत्कालीन इतिहासाचा अभ्यास करून मूर्तिकार उघडे यांनी छत्रपती शिवरायांची अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती केली केली आहे. ‘सबका साथ,सबका विकास’ असं म्हणत छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन 2014 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारने अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाची भूमिपूजन करून सुद्धा शिवस्मारकाची साधी वीट सुद्धा बसवली नाही. विद्यमान महाविकास आघाडी सरकारने शिवस्मारकाचा विषय सुरू करण्यापूर्वीच शिवस्मारक समितीचे अध्यक्षने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. निवडणुकीपुरते लोकांच्या भावनेशी खेळून ‘मतरुपी’ आशीर्वाद पदरात पाडणार्‍या राजकारण्यांच्या पुढे समस्त फुरसुंगी गावकऱ्यांनी पुणे जिल्ह्यात आदर्श उभा केला आहे.”गाव करील ते राव करील काय ? या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीचे सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली आहे.

अधिक वाचा  बाबासाहेबांसोबत रक्ताचं नात नसलं तरी त्यांच्या विचारांचे वारसदार कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर

अखिल फुरसुंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम कामठे यांनी न्यूजमेकर.Live च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. रक्ताचा अभिषेक घालून घेतलेली शपथ शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने 6जुन 1674 रोजी रायगडावर शिवराज्यभिषेक घालून स्वतःला ‘छत्रपती’ घोषित केले. सर्वसामान्य नागरिकांच्या उद्धारासाठी लोकशाही राज्य स्थापन केले. छत्रपती शिवराय त्यांच्या प्रेरणेतून 20 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीने पूर्ण झाले.”

फुरसुंगीगावच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या, इतिहासाचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या या निर्मितीमध्ये ज्ञात-अज्ञात अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मारुती काळे, निलेश पवार, योगेश शिंदे, चार्टर अकाउंटंट मच्छिंद्र कामठे, नगरसेवक गणेश ढोरे, शैलेश कामठे, नितीन कामठे, निलेश पवार, गणेश कामठे, अमोल हरपळे, संदीप हरपळे, बाळासाहेब पिंटूशेठ हरपळे, उमेशशेठ हरपळे, विजय हरपळे, विलास पुणेकर, प्रदीप पवार, सचिनशेठ कामठे, संतोष हरपळे, जितेंद्र कामठे, विनोद कामठे, गणेश कामठे, प्रशांत हरपळे, आदीनी सहकार्य व परिश्रम घेतले आहेत.