भदोही : उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या विरोधात बुधवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ती घडामोड सत्तारूढ भाजपच्या दृष्टीने नाचक्की ठरणार आहे. एका विधवा महिलेने त्रिपाठी यांच्यासह सात जणांविरोधात नुकतीच तक्रार दिली. त्यावरून सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. उत्तरप्रदेशात 2017 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी एका हॉटेलमध्ये महिनाभर डांबून ठेवण्यात आले.
तिथे आरोपींनी सातत्याने लैंगिक अत्याचार केले, असा आरोप संबंधित महिलेकडून करण्यात आला. लैंगिक अत्याचारांनंतर ती महिला गरोदर बनली. मात्र, तिला आरोपींनी गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप त्या महिलेने केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आमदाराविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे भाजपवर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे.

अधिक वाचा  'जय भीम' ठरला ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट