बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. कारण काय तर तिचा टॉपलेस फोटो. होय, कियाराने नुकतेच बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. या कॅलेंडरसाठी कियाराने टॉपलेस होत पोज दिली. तिचा हा फोटो व्हायरल झाला अन् नेटक-यांनी कियाराची मजा घेणे सुरु केले.


फोटोमध्ये कियारा टॉपलेस असून एका पानाच्या मागे उभी आहे. कियाराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पूर आला. काही नेटक-यांनी तर यापुढे जात कियाराचा फोटो एडिट करुन तिला कपडे घालण्याचा पराक्रमही केला.
कियाराचा टॉपलेस फोटो काढणारा डब्बू रत्नानी हाही ट्रोल झाला. भागो डब्बू, कबीर सिंग आ रहा है… असे अनेक जोक्स, मीम्स सोशल मीडियावर पडले.
गतवर्षी कबीर सिंग हा सिनेमा रिलीज झाला होता. यात कियारा व शाहिद कपूर लीड रोलमध्ये होते. या चित्रपटात शाहिदने एका पजेसिव्ह बॉयफ्रेन्डची भूमिका साकारली होती. तर कियारा त्याच्या गर्लफ्रेन्डच्या भूमिकेत होता. हा संबंध जोडत लोकांनी कियाराची चांगलीच मजा घेतली. पाहा तर काही मजेशीर मीम्स…

अधिक वाचा  निलेश लंके यांची विखे कुटुंबावर सुस्तीसुमने; माझी यापुढे यासाठी धावपळ नरमाईची भूमिका! तरीही मने जिंकली