मुंबई: मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या अचानक झालेल्या बदलीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी तपासादरम्यान आरोपी पीटर मुखर्जी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असा मारिया यांच्यावर आरोप होता. पीटर आपली पहिली पत्नी इंद्राणीची मुलगी शीना हिच्या हत्येचे आरोपी आहेत.
शीना बोरा हत्या प्रकरण 2015 मध्ये पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिला अटक केली. इंद्राणीवर शीनाच्या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राकेश मारिया मुंबई पोलीस आयुक्त होते. यादरम्यान इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची जोरदार चौकशी केली होती.
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राकेश मारियाला प्रमोशन देऊन होमगार्डच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी असं अनुमान लावण्यात आलं होतं की राकेश मारियांची बदली महाराष्ट्राचे सरकार बदलल्याने झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शीना बोरा हत्या प्रकरणातील चौकशीमुळे नाखूष होते. त्यांना पीटर मुखर्जीबद्दल फार काळ माहितही नव्हते. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सीबीआयकड़े सोपवले.
आपल्या ‘Let Me Say It Now’ या पुस्तकात राकेश मारिया यांनी लिहिले आहे की, मुंबई पोलीस एका अधिकाऱ्याने शीना बोरा हत्या प्रकरणाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण माहितीपासून त्यांना लांब ठेवले. शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. बदलीसंदर्भात मारिया यांना सूचित करण्यात आले होते. यावेळी मारिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलीस आयुक्तांचे उत्तराधिकारी जावेद अहमद यांचे पीटर मुखर्जींसोबतचे संबंध माहिती होते. मारिया यांनी रायगड जिल्ह्यातील पोलिसांकडून सुरू केलेल्या तपासाचे पुढे काय झाले? हादेखील प्रश्न उपस्थित केला. 2012 मध्ये मानवी अवशेष सापडले जे नंतर शीनाचे असल्याची माहिती समोर आली.
तपासादरम्यान पीटर मुखर्जी भारतात नव्हते
मारिया यांनी सांगितले की, त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शीना बोरा हत्या प्रकरणाबाबत फक्त एकदा बातचीत केली. आणि त्यांना सांगितले की गुन्हा घडला तेव्हा पीटर भारतात नव्हता. मात्र तो या हत्येत सहभागी आहे की नाही याचा तपास सुरू आहे. मारिया पुढे जाऊन असंही म्हणाले की त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवून आश्वस्त केलं होतं. आणि एक स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात येईल असंही नमूत केलं होतं. मात्र असं झालं नाही.
मारिया आणि फडणवीस यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला होता. मारिया यांनी अशी शंका होती की कोणीतरी फडणवीसांना चुकीची माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण द्यायचे होते. याबाबत मी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव केपी बख्शी यांना विचारले. मीडियासमोर खुलासा करण्याबाबत विचारले. मात्र यासंदर्भात कोणतेही उत्तर आले नाही. शेवटी तीन महिन्यांनी मारिया सेवानिवृत्त झाले.

अधिक वाचा  मांजाला ७० फुट उंचावर अडकलेल्या कबुतराची सुटका!