अंबाला : व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधून तरुण-तरुणीने लग्न केलं. त्यानंतर दोनच दिवसांनी तरुणीनं मुलीला जन्म दिला. हरियाणातील अंबाला शहरात ही घटना घडली आहे. लग्नानंतर दोन दिवसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिने मुलीला जन्म दिल्यानतंर सासरची मंडळी आणि पतीला धक्का बसला आहे.
याबाबत अंबाला शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरियाणातील मनमोहन नगरमधील हा प्रकार आहे. 14 फेब्रुवारीला 20 वर्षीय तरुणीचे लग्न झाले होते. दोन दिवसांनी सोमवारी तिला रक्तस्राव झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तरुणीने मुलीला जन्म दिला. सध्या ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. हे प्रकरण आमच्याकडे आले असून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
डॉक्टरांशी या प्रकरणी चौकशी केली आहे. मुलीला रक्तस्राव होत असल्याने तिला याबाबत समजले नाही. मुलीसोबत फक्त तिची बहिण होती. सासरचे कोणीही तिच्यासोबत नव्हते असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.
लग्नानंतर दोन दिवसांत तरुणीने अपत्याला जन्म दिल्यानं सासरच्या मंडळींना धक्का बसला आहे. नवजात मुलीला स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. मुलगी गर्भवती आहे हे समजलं कसं नाही असा प्रश्न विचारताच आजार असल्याचं सांगतं सत्य लपवल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला. तर मुलीच्या मोठ्या बहिणीने यासाठी शेजारी राहणाऱी व्यक्ती दोषी असल्याचा आरोप केला आहे.

अधिक वाचा  सलमानचं नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयन व्हूज