पुणे: परदेशातून भारतात कोणतीही वस्तु आणण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळं लोकं तस्करीचा मार्ग अवलंबतात. त्यासाठी कोण काय मार्ग निवडेल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शेंगदाण्यात विदेशी नोटा लपवून आणल्या होत्या. आता तर एका महिलेने चक्क आपल्या शरीरातील खाजगी भागात सोने लपवून आणले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम डिपार्टमेंटने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्व अधिकारी हैराण झाले. महिला अधिकाऱ्यांनी या आरोपी महिलेची चौकशी केली त्यांना शरीरात लपवलेले सोने सापडले.
अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली पकडलेल्या महिलेच्या खासगी भागातून (गुदाशय) सोन्याची बिस्किटे जप्त केली. त्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव मरियम मोहम्मद सलीम शेख असून, ती पुण्यात दुबईहून आली होती. विमानतळावर ही महिला स्कॅनरमधून जात असताना अधिकाऱ्यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी या महिलेचा तपास केला. त्यानंतर वैद्यकीय पथकाला तपासासाठी बोलावले. या पथकाने केलेल्या तपासात या महिलेने खासगी भागात (गुदाशय) सोने लपवले होते. दरम्यान आता या महिलेला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
या सगळ्या प्रकारानंतर सर्व प्रवाशांना सक्त ताकिद दिली आहे. तस्करी हा प्रकार बेकायदेशीर असल्यामुळे यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं पोलिसांनी अशा गोष्टी करू नयेत असा सल्ला दिला आहे.

अधिक वाचा  अमित शाहांची अजितदादांशी चर्चा अन् ‘सह्याद्री’वर खलबतं 3 गोष्टी फायनल; जागावाटप ‘हा’ निकष ठरवला