आळंदी देवाची (दिनेश कुर्‍हाडे) : महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंकिता गुंड हिला महाराष्ट्र शासनाचा २०१८-१९ चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अंकिता गुंड यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत विविध पदके पटकावले आहेत. आंतरराष्ट्रीय पंच प्रा.दिनेश गुंड यांची अंकिता ही कन्या आहे. अंकिता गुंड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आळंदी शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आळंदी नगरपरिषद माजी नगरसेवक दिनेश घुले, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, उद्योजक आनंद वडगावकर, प्रसिद्ध निवेदक सचिन सोळंकर आणि पत्रकार दिनेश क-हाडे उपस्थित होते.

अधिक वाचा  भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद तावडे यांचे नाव नाहीच? कुणाची वर्णी? ‘ही’ दोन नावं चर्चेत; RSSच्या मुख्यालयात ठरणार