पुणे: कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी अन माजी कृषी मंत्री शशिकांत भाऊ यांचे हक्काच आमत्रंण म्हणजे एक अनोखा हास्यकल्लोळ होणार यात काही शंका नव्हती अन माजी महापौर अंकुश काकडे यांच्या तुफान फटकेबाजी नंतर बापट यांनी केलेल्या विनोदी कोटीमुळे तसेच घडलंही. निमीत्त होते पुण्याचे महापौरपद कोथरूड़ ला प्रथम मिळाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या नागरी सन्मान सोहळ्याचे. यावेळी व्यासपीठावर खासदार गिरीश बापट, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, शिवसेनेचे माजी मंत्री शशीकांत सुतार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकात मोकाटे, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश बागवे, माजी महापौर अकुश काकडे, मनसेचे नेते बाबू वागसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल म्हणाले कि, भाजपा हा कामाच्या जिवावर जास्त संधी देणारा पक्ष असून मुरलीधर मोहोळ यांची ही सुरुवात आहे तर मोहोळ यांच्या कष्टामुळेच मी आज आमदार झालो आहे. भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये कायम नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये कायमच वरच्या फळीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मुरलीधर मोहोळ यांचा आश्वासक चेहरा असून त्यांना खूप पदांवर काम करायचे आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या कोणत्याही काकडेवर अंकुश ठेवणे अवघड म्हणताच सभागृहात हशा पिकला तर “मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक तर महापाप करणारा महापौर होतो” राजकीय जीवनात महापौर आणि नगरसेवक होणं खूप कठीण असतं. प्रत्येक गोष्टीसाठी या दोघांनाच जबाबदार धरलं जातं.
पुण्यात सध्या वाढते शहरीकरण ही खूप मोठी समस्या असून पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे महत्त्व देण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांची मदत होईल. मोहोळ यांना कुस्ती आखाड्याची परंपरा असली तरी त्यांच्यामध्ये आर एस एस चा संयमी बाणा असल्याने त्यांना भविष्यात अनेक पद सांभाळायची आहेत असे फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माजी महापौर अंकुश काकडे यांनी भाषणाला सुरुवात करतानाच महाविकास आघाडीची आठवण करून देत केवळ चंद्रकांतदादा पाटिल यांच्यामुळेच मुरलीधर मोहोळ हे महापौर झाले. जर चंद्रकांतदादा पाटील कोथरूड मतदारसंघातून आमदार झाले नसते तर मुरलीधर मोहोळ यांना कदाचित वेगळी जबाबदारी द्यावी लागली असती असे सांगून सभागृहात हशा पिकवला. आजपर्यंत वंदना चव्हाण यांनी माझ्या सर्व संधी हिरावून घेतली असल्या तरी आज त्यांच्याजागी बोलण्याची संधी मला मिळाल्याचे सांगत मोठ्या मुश्किलीने आपली खंत व्यक्त केली. तर खासदार बापट यांनी हे आमचे सार्वजनिक काका असून ते कधीही आमदार झाले असते परंतु आम्ही पुणेकर असून आमच्या जवळच्या माणसाला मी पुण्यातच ठेवतो असे सांगत काकडे यांच्या दुःखाला हास्याचे झालंर लावण्याचे काम केले. शेवटी समाधान मानण्यात असते जसे की कोथरूड चे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना सर्व आवडीने CM म्हणतात; त्यांना भविष्यात CM कधी होता नाही आले तरी सर्वजण आपणाला CM म्हणतात यात आनंद वाटतो असे सांगताच पुन्हा सभागृहात हास्य फुलले.